Maratha Reservation | PM मोदी आज शिर्डी दौऱ्यावर; मराठा समाज अडवणार मोदींचा ताफा?

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | शिर्डी: राज्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालेला असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

आज ते शिर्डीत साई चरणी नतमस्तक होतील. अशात मराठा समाज नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कारण गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य शासनाला 40 दिवसांचा वेळ दिला होता.

परंतु, या चाळीस दिवसांमध्ये सरकारने कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मराठा समाज आणखीन आक्रमक झालेला आहे.

याचे परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठा समाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचं देखील राज्याच्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

आज सकाळी वकील गुणवंत सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केली असल्याच्या चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “मराठा समाजाचे (Maratha Reservation) हे आंदोलन अत्यंत शांततेने सुरू आहे. हजारो गावांमध्ये मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे.

परंतु, मराठा समाज शांतता सोडून दुसऱ्या पद्धतीने आंदोलन करत नाही. गुणवंत सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड कोणी केली? याबाबत आम्हाला अद्याप काहीच माहिती नाही. परंतु, या प्रकरणाचं आम्ही समर्थन करत नाही.”

Manoj Jarange commented on Devendra Fadnavis

यावेळी बोलत असताना मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. “आम्ही आतापर्यंत त्यांचे अत्यंत लाड केले आहेत. त्यांनी त्यांचे मूल-बाळ मोठे केले आहेत.

परंतु, त्यांना आमच्याशी काही घेणं देणं नाही. आम्ही मोठे होऊ नये, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु, आम्ही शांततेत आंदोलन करून त्यांचे सर्व प्रयत्न वाया घालवणार आहोत.

मराठा समाजाला (Maratha Reservation) कोण श्रद्धेय आरक्षण मिळू देत नाही? सर्वांना माहित आहे. त्या श्रद्धेयांना मराठ्यांनी मोठं केलं आहे. मात्र, ते आता मराठ्यांना मोठं होऊ देत नाही.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe