Maratha Reservation | सरकार अजून किती तरुणांचा जीव घेणार? मराठा आरक्षणासाठी आणखी एक युवकाची आत्महत्या

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी झटत आहे. गेल्या महिन्यात त्यांनी या मुद्द्यावरून उपोषण सुरू केलं होतं.

परंतु, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेत राज्य सरकारला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा वेळ दिला होता.

आता हा कालावधी संपलेला आहे. मात्र, राज्य शासनाने या मुद्द्यावर अजून ठोस निर्णय घेतलेला नाही. यानंतर मराठा समाज आणखीन आक्रमक झाला आहे. अशात मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी बीड जिल्ह्यात आणखीन एका मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

A youth committed suicide for Maratha reservation

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. अशात मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी बीड जिल्ह्यातील शहाजानपूर लोणी या गावातील 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

अशोक मते असं या तरुणाचं नाव आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्यानं आत्महत्या करत असल्याचं अशोक यांनी त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. त्याचबरोबर त्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर मराठा सकल समाजाचे समन्वयक बाबा इंदुलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लोक कोर्टात घेतलेल्या शपथेवर सर्रास खोटे बोलतात, आतापर्यंत असा आम्हाला अनुभव आलेला आहे.

अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत शपथ घेतली आहे. परंतु, त्यांचा पूर्वीचा इतिहास पाहता त्यांच्या शपथेवर विश्वास ठेवता येत नाही. 2014 आणि 2018 मध्ये काय घडलं होतं? याचं आधी एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यायला हवं”, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe