Share

Maratha Reservation | मराठा आंदोलनाचे पडसाद राजकीय वर्तुळात; तीन नेत्यांनी राजीनामा देत दर्शवला पाठिंबा

Maratha Reservation | पुणे: गेल्या महिन्यात जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण राज्यभर पसरलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा … Read more

Published On: 

Maratha Reservation | पुणे: गेल्या महिन्यात जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं होतं.

त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण राज्यभर पसरलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. अशात पुणे जिल्ह्यात एक आश्चर्यचकित घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील कानगाव ग्रामपंचायत मधील तीन जणांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे.

या तिघांनी ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा देत मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार टाळाटाळ करत असल्याने आपण हा राजीनामा देत असल्याचं या तिघांनी सांगितलं आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Shambhuraj Desai commented on Maratha Reservation

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे यांच्याकडे आणखीन मुदत मागितली आहे.

ते म्हणाले, “मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी सर्व कायदेशीर बाजू समजून घ्यायला हव्या. पूर्वी दीड वर्ष हायकोर्टामध्ये मराठा समाजाचं आरक्षण टिकलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अत्यंत बारकाईने लक्ष देऊन काम केलं होतं.

कायदेशीर गोष्टीवर ठोस निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे मी आधीपासूनच मनोज जरांगे यांना विनंती करत आहे की, मराठा समाजाला जर टिकणारं आरक्षण हवं असेल तर राज्य शासनाला थोडा वेळ द्यायला हवा.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही