Share

Manoj Jarange | मराठा समाज माझा माय बाप, मी खोटं बोलणार नाही – मनोज जरांगे

Manoj Jarange | जालना: मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. हा कालावधी संपलेला आहे. मात्र, तरी देखील राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही ठोस निर्णय घेतलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं … Read more

Published On: 

Manoj Jarange | जालना: मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. हा कालावधी संपलेला आहे.

मात्र, तरी देखील राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही ठोस निर्णय घेतलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange’s reaction on Maratha reservation

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “आजपासून आमचं हे आमरण उपोषण सुरू झालं आहे. यामध्ये ना अन्न पाणी, ना वैद्यकीय उपचार, ना सलाईन, आमचं हे उपोषण कडक आणि आमरण असणार आहे.

मराठा समाज माझा मायबाप आहे, मी खोटे बोलणार नाही. मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा, अशी आम्ही त्यांना विनंती केली होती. मराठा समाज अत्यंत मोठा आहे. त्यामुळे त्यांनी यामध्ये दखल घ्यायला हवी.”

Manoj Sarange comment on Girish Mahajan

दरम्यान, मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना आणखीन मुदत मागितली आहे.

यावर बोलत असताना मनोज जरांगे (Manoj Sarange comment on Girish Mahajan) म्हणाले, “जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ, असं तुम्ही म्हटलं होतं. परंतु, अजून तुम्ही गुन्हे मागे घेतलेले नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही राज्य शासनाला एक महिन्याऐवजी 40 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र, अद्याप आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही