Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण (Maratha Reservation) मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं हे आंदोलन सुरू आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला 40 दिवसाचा कालावधी दिला होता. ही मुदत आज संपलेली असून मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहे.
याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोण आरक्षण देऊ देत नाही? याचा शोध आम्ही आज दिवसभरात घेणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Manoj Jarange comments on Eknath Shinde
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “राज्याच्या राजकारणात नक्की काहीतरी शिजत आहे. नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली नसती.
त्यांना काही ठोस निर्णय घ्यायचा नसता, तर त्यांनी 40 दिवसांची मुदत घेतली नसती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे. मात्र त्यांना कोण आरक्षण देऊ देत नाही? याचा शोध आम्ही आज दिवसभरात घेणार आहे.
एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतात, ही त्यांची राजकीय ख्याती आहे.” देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेऊ देत नसल्याचं मनोज जरांगे यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.
Manoj Jarange‘s reaction on Maratha reservation
पुढे बोलताना ते (Manoj Jarange) म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणामुळे मराठा तरुणांचं आयुष्य उध्वस्त झालं आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने आमरण उपोषण सुरू करणार आहोत.
राज्य शासनाचा आणि मुख्यमंत्र्यांचा मान ठेवून आम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी त्यांना 40 दिवसांचा कालावधी दिला होता. आज 41 व्या दिवशी राज्य शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
या मुद्द्यावर काहीतरी निर्णय येईल, अशी आम्हाला काल संध्याकाळपर्यंत अशा होती. परंतु, काल काहीच घडलं नाही. त्यामुळे अंतरवाली सराटी या ठिकाणी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला आम्ही सुरुवात करणार आहोत.”
महत्वाच्या बातम्या
- Keshav Upadhye | कितीदा नव्याने खोटे बोलावे, एकच रडगाणे सारखे ऐकवावे; भाजपची उद्धव ठाकरेंवर काव्यात्मक टीका
- Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली – चंद्रशेखर बावनकुळे
- Maratha Reservation | मराठा समाज आक्रमक; मनोज जरांगे आज पासून करणार आमरण उपोषण
- Uddhav Thackeray | ‘खोके’ शाहीत रमलेलं सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं लांच्छन कसं दूर करणार? ठाकरे गटाचा खोचक सवाल
- Weather Update | नागरिकांनो सावधान! तेज चक्रीवादळामुळे ‘या’ ठिकाणी होणार पाऊस