Keshav Upadhye | कितीदा नव्याने खोटे बोलावे, एकच रडगाणे सारखे ऐकवावे; भाजपची उद्धव ठाकरेंवर काव्यात्मक टीका

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: काल (24 ऑक्टोबर) शिवतीर्थावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा पार पडला.

यावेळी सभेला संबोधित करत असताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तुलना हिटलरशी करत त्यांच्यावर टीका केली आहे.

येत्या काळात भाजपचं सरकार नक्की जाणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माणिपूरमध्ये जाऊन हनुमान चालीसा म्हणावी. केंद्र सरकार मुंबई लुटण्याचा प्रयत्न करत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कवितेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. कितीदा नव्याने खोटे बोलावे, एकच रडगाणे सारखे ऐकवावे, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, “(उध्दव ठाकरेंसाठी)

कितीदा नव्याने खोटे बोलावे
एकच रडगाणे सारखे ऐकवावे…

किती ही लाचारी त्या खुर्चीसाठी,
कितीदा वाकावे काँग्रेससाठी,
कितीदा स्वतःचे हसे करून घ्यावे…

किती गुंडाळावे वडिलांच्या पुण्याईला,
किती दाखवावे खोट्या हिंदुत्वाला,
कितीदा रडुनी हसे करून घ्यावे…

कितीदा नव्याने खोटे बोलावे.”

Uddhav Thackeray paid tribute to Balasaheb Thackeray’s thoughts – Chandrashekhar Bawankule

दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देखील उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.

ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर काँग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. खरं तर हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांना इंडी आघाडीचे गोडवे गावे लागत आहेत.

नरेंद्र मोदीजींचं कर्तृत्व संपूर्ण देशानं मान्य केलं आहे. पण उध्दव ठाकरे त्यांच्यावर टीका करत आहेत. खरं तर ती त्यांची पात्रता नाही. संपूर्ण देश मोदीजींचं कुटुंब आहे पण ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी‘ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना ते कळणार नाही.

उद्धव ठाकरे शिवतीर्थावर बोलताना हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबद्दल बोलतील असं वाटलं होतं पण ते मूग गिळून गप्प बसले.

कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केल्याबद्दल ते आज तरूणांची माफी मागतील, असं वाटलं पण त्यांना महाराष्ट्रातील तरूणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची जास्त चिंता वाटत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.