Share

Maratha Reservation | मराठा समाज आक्रमक; मनोज जरांगे आज पासून करणार आमरण उपोषण

🕒 1 min readMaratha Reservation | जालना: सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहे. या आंदोलनादरम्यान जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी दिला होता. जरांगे यांनी दिलेली मुदत आज संपत आहे.Related News for You‘लाडकी बहीण … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | जालना: सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहे.

या आंदोलनादरम्यान जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी दिला होता. जरांगे यांनी दिलेली मुदत आज संपत आहे.

त्यामुळे मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्हा पातळीवर आजपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

Manoj Jarange will hold a press conference at 11 am

मनोज जरांगे यांनी सरकारला मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी चाळीस दिवसांचा कालावधी दिला होता.

चाळीस दिवसांचा अल्टिमेट आज संपला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे नक्की काय बोलतील? याकडे आता संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी गिरीश महाजन यांनी जरांगे यांना सरकारला थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे. परंतु, मनोज जरांगे यांनी वेळ देण्यास नकार दिला आहे.

सरकारने या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला होता. मात्र, आम्ही त्यांना एक महिन्याहून अधिक कालावधी दिला होता. यापेक्षा अधिक वेळ आम्ही राज्य सरकारला देऊ शकत नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!