Prakash Ambedkar | आमच्या हातात सत्ता आली तर नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात टाकू – प्रकाश आंबेडकर

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Prakash Ambedkar | अकोला: दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात विजयादशमीनिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आरएसएसचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलत असताना त्यांनी मणिपूर हिंसाचारावर आणि आगामी निवडणुकांवर भाष्य केलं.

त्यांच्या या भाषणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. आम्ही सत्तेत आलो तर नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना तुरुंगात टाकू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Mohan Bhagwat means Narendra Modi – Prakash Ambedkar

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “मोहन भागवत यांचं भाषण म्हणजे चोराच्या मनात चांदणं.

भारतीय जनता पक्ष म्हणजेच संघ आहे. त्याचबरोबर मोहन भागवत म्हणजेच नरेंद्र मोदी आहेत. ते लोकांचं मन खराब करायचं काम करतात. औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानंतर त्यांनीच कारवाई केली होती.

त्याचबरोबर माणिपूरच्या संदर्भात देखील त्यांनी तेच केलं. तेच दंगली घडवून आणतात. सध्या ते फक्त निवडणुकांसाठी सावरासावर करत आहे. आम्ही सत्तेत आलो तर नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू.”

दरम्यान, मोहन भागवत यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “निवडणुकांमध्ये मतदान करणं, हा सर्वांचा अधिकार आणि कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी मतदान करायलाच हवं.

सर्व लोक मतदान करतील, यासाठी आरएसएसचे कार्यकर्ते काम करणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी पाहून मतदान करू नये, त्याचबरोबर मतदार भडकावू भाषण ऐकू नये. डोकं शांत ठेवून कोण चांगलं काम करतो? याचा विचार करून मतदान करायला हवं.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe