Bank Job | बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Bank Job | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील जारी करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेल्या या भरती (Bank Job) प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये क्रेडिट ऑफिसर स्केल || पदाच्या 50 आणि क्रेडिट ऑफिसर स्केल ||| पदाच्या 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करताना जनरल/ओबीसी/EWS श्रेणीतील उमेदवारांना 1180 रुपये फी स्वरूपात भरावे लागणार आहे. तर SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांना 118 रुपये फी भरावी लागणार आहे.

या भरती (Bank Job) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1zv1o9kD-ehretM6UnnstZguLKdLuX4B7/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://bankofmaharashtra.in/

दरम्यान, बँकेच्या (Bank Job) या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://ibpsonline.ibps.in/bomcooct23/

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe