Pankaja Munde | आपल्याला त्रास देणाऱ्याचं घर उन्हात बांधू – पंकजा मुंडे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Pankaja Munde | बीड: आज देशामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्यानिमित्त मुंबईमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.

तर दुसरीकडे परळीतील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पंकजा मुंडे यांची निष्ठा लेची-पेची नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

I have only righteousness – Pankaja Munde

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, “माझ्यामध्ये फक्त आणि फक्त नीतिमत्ता आहे. माझ्यामध्ये बाकी दुसरं काही नाही. माझ्याकडे गोपीनाथ मुंडे यांची लेक म्हणून असलेली हिंमत आणि माझ्या लोकांचा विश्वास आहे.

कुणी म्हणतं पंकजाताई या पक्षात चालत्या, तर कुणी म्हणतं त्या पक्षात चालल्या चालल्या आहे. परंतु, पंकजा मुंडे यांची निष्ठा एवढी लेची- पेची नाही. पद देऊन तुम्हाला ती मिळवता आली नाही. पद नसताना देखील निष्ठा काय असते ते माझ्या जनतेला विचारा.

त्यांच्या मनावर हजार आघात झाले, हजार वेळा त्यांची स्वप्न तुटली, परंतु त्यांनी कधी माघार घेतली नाही. ब्रह्मा, विष्णू, महेश सर्वांना आपल्या युद्धांमध्ये हार पत्करावी लागली होती. त्यांना देखील अनेक संकटांना सामोरं जावं लागलं आहे.”

पुढे बोलताना त्या (Pankaja Munde) म्हणाल्या, “भगवान बाबाने आता आपल्यावर सावली धरली आहे. आता आपल्या डोक्यावर ऊन नाही. तर आता आपल्याला त्रास देणाऱ्याचं घर आपण उन्हात बांधू. यापुढे माझे माणसं उन्हात राहणार नाही.

त्याचबरोबर आता माझी माणसं संयम दाखवणार नाही. माझी माणसं भगवान शिवाचं रूप आहे. भगवान शंकर अत्यंत भोळा आहे. मात्र, त्यांना देखील तिसरा डोळा आहे. जिंकण्यासाठी तुम्ही काहीही करू शकतात.

मात्र, जिंकण्यासाठी आम्ही आमची निष्ठा गहाण ठेवू शकत नाही. जोपर्यंत मी शिवशक्ती परिक्रमा यात्रा केली नव्हती, तोपर्यंत मला वाटायचं मी बँकेची कर्जदार आहे, त्याचबरोबर मी पक्षाची खरी कार्यकर्ता आहे.

पण, शिवशक्ती परिक्रमा यात्रा केल्यानंतर मला साक्षात्कार झाला. त्यानंतर मला कळालं मी त्यांची नाही तर जनतेची कर्जदार आहे. कारण माझ्या कारखान्यासाठी जनतेने लगेच 11 कोटी रुपये जमा करून दिले.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe