Nilesh Rane | भाजपला मोठा धक्का! निलेश राणे राजकारणातून कायमचे बाहेर

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात कधी काय घडले? याचा अंदाज लावणे आता कठीणच नाही तर अशक्य झाले आहे.

अशात भारतीय जनता पक्षासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप नेते निलेश राणे सक्रिय राजकारणातून कायमचे बाजूला होत आहे.

स्वतः निलेश राणे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या या ट्विट नंतर भाजपच्या चिंतेत भर पडली आहे. तर त्यांनी अचानक राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

There is no peace in politics – Nilesh Rane

भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) सक्रिय राजकारणातून कायमचे बाजूला झाले आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.

मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन.

निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही.

कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.