UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते.
अशात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (UPSC Recruitment) विविध पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
यामध्ये सहाय्यक संचालक, विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (एंडोक्रिनोलॉजी), विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (पल्मोनरी मेडिसिन), सहाय्यक वास्तुविशारद, ड्रिलर-इन-चार्ज, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-उपमहासंचालक (तांत्रिक), जहाज सर्वेक्षक-सह-उपसंचालक सामान्य (तांत्रिक) पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.
केंद्र सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये (UPSC Recruitment) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://www.upsconline.nic.in/oralateral/VacancyNoticePub.php
दरम्यान, या भरती (UPSC Recruitment) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1N0Zoq04zY4NjCyzgBsh2Xc0WxoOM7jPZ/view
अधिकृत संकेतस्थळ (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Yashomati Thakur | पीओ बियर, करो सरकार को चिअर; यशोमती ठाकूर यांची राज्य सरकारवर खोचक टीका
- Namo Shetkari Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना गुरुवारी मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता
- Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांनी आधी ड्रग्सच्या रावणाला संपवावं अन् मग जय श्रीराम म्हणावं – संजय राऊत
- Uddhav Thackeray | सध्याचं शासन श्रीरामाचा गजर करत सरकारी प्रमोशन करतंय; ठाकरे गटाचा हल्लाबोल
- Weather Update | ढगाळ वातावरणामुळे ऑक्टोबर हिटपासून दिलासा, पाहा आजचा हवामान अंदाज