Weather Update | ढगाळ वातावरणामुळे ऑक्टोबर हिटपासून दिलासा, पाहा आजचा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील हवामानामध्ये बदल होताना दिसत आहे. कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

परिणामी अरबी समुद्रामध्ये तेज चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, सध्या हे संकट टळलेलं असून राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळत आहे.

A ‘tej’ cyclone was likely to form in the Arabian Sea

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे अरबी समुद्रात तेज चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त (Weather Update) केला होता. परंतु, तेज चक्रीवादळाने आपला मार्ग बदलल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता कमी झाली आहे.

पावसाची शक्यता नसली तरी राज्यात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांना ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, तेज चक्रीवादळ आजपासून बांगलादेशच्या दिशेने वाटचाल करणार आहे. परिणामी पश्चिम बंगालसह ईशान्य भारतात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

अरबी समुद्रामध्ये तयार झालेले तेज चक्रीवादळ ओमानच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहे. त्यामुळं राज्यामध्ये पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

बिपरजॉय चक्रीवादळानंतर तेज चक्रीवादळ अरबी समुद्रातील सर्वात मोठं चक्रीवादळ ठरणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. सुदैवाने या चक्रीवादळाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नसल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली (Weather Update) आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.