Share

Ajit Pawar | दोन मुलांवर थांबा, कारण ती देवाची नाही तर आपलीच कृपा असते – अजित पवार

Ajit Pawar | सोलापूर: देशातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टिपणी केली आहे.

जसजशी पिढी वाढते तसतसे शेतीचे तुकडे वाढत जातात. परिणामी शेतकरी अल्पभूधारक होतो, त्यामुळं दोन मुलांवर थांबा. कारण ती देवाची नाही तर आपलीच कृपा असते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “एखाद्याकडे 70 एकर जमीन असेल तर त्यांना सात मुलं असतात. त्यानंतर जमिनीचे तुकडे होतात  आणि प्रत्येकाला दहा एकर जमीन मिळते.

त्यानंतर त्यांना दोन मुलं होतात. त्यानंतर पुन्हा शेतीचे तुकडे होतात आणि पाच एकर शेती एकाच्या वाट्याला येते. त्यानंतर पुन्हा दोन मुलं होतात आणि शेतीचे तुकडे होऊन अडीच एकर एकाच्या वाट्याला येते. त्यानंतर शेतकरी अल्पभूधारक होतो.

एवढं सगळं असून देखील कोणी थांबायला तयार नाही. आपण दोन अपत्यांवरती थांबायला हवं. कुठल्याही जाती, धर्मामध्ये अपत्य प्राप्तीला देवाची कृपा म्हणत नाही. उलट ती सर्व आपलीच कृपा असते. देवाची कृपा सांगून लोकांना बनवण्याचा प्रयत्न करू नका.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा देशाची संख्या 35 कोटी होती. आता ही संख्या 140 कोटींवर जाऊन पोहोचली आहे. 75 वर्षात चौपट लोकसंख्या वाढली आहे.

We are trying to get sustainable reservation – Ajit Pawar

यावेळी बोलत असताना त्यांनी मराठा आरक्षणावर देखील भाष्य केलं आहे. ते (Ajit Pawar) म्हणाले, “मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने 40 दिवसांचा कालावधी मागितला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही तज्ञ लोकांसोबत चर्चा करत आहोत. सध्या आम्ही राज्यकर्ते आहोत. आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं आणि उद्या ते टिकलं तर लोक आम्हालाच बोलतील. राज्यकर्ते आम्हाला फसवतात, असं जनता म्हणेल. त्यामुळे आम्ही टिकाऊ आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar | सोलापूर: देशातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टिपणी केली आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now