Namo Shetkari Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना गुरुवारी मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Namo Shetkari Yojana | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे.

या योजनेतील पहिल्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे. अशात पहिल्या हप्त्याबाबत मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिला हप्ता शेतकऱ्यांना 26 ऑक्टोबर 2023 रोजी मिळणार आहे. तब्बल 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना या योजनेतील पहिल्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

The farmers will get the first installment of this scheme on October 26

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते. तर नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करते.

26 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना या योजनेतील पहिला हप्ता मिळणार आहे. या योजनेतील पहिला हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे.

तर दुसरीकडे पीएम किसान योजनेतील 15 वा हप्ता देखील याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, केंद्र सरकारकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी प्रधानमंत्री किसान निधी सन्मान योजना सुरू केली आहे.

आजपर्यंत कोट्यावधी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळवला आहे. अशात ज्या शेतकऱ्यांनी अजून या योजनेसाठी नोंदणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर यासाठी आपले नाव नोंदवून घ्यावे. https://pmkisan.gov.in या वेबसाईटद्वारे शेतकरी प्रधानमंत्री किसान योजनेसाठी आपले नाव नोंदवू शकतात.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe