Sambhaji Bhide | नेत्यांपासून जनतेपर्यंत सगळेच फालतू – संभाजी भिडे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Sambhaji Bhide | सांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरामध्ये नऊ दिवस दुर्गामाता दौड सुरू होती.

युवकांमध्ये देशभक्ती आणि धर्माबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी या दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. आज या दुर्गामाता दौडची सांगता झाली आहे.

या समारोप समारंभामध्ये बोलत असताना संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. नेत्यांपासून जनतेपर्यंत सगळेच फालतू आहे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

From the leaders to the masses, everyone is in vain – Sambhaji Bhide

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले, “दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा प्रारंभ आहे. कर्तुत्व शून्य हिंदू समाजाला सीमोल्लंघनासाठी कटिबद्ध करण्यासाठी दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते.

नेत्यांपासून जनतेपर्यंत सगळेच फालतू आहे.” संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राज्यकारणात नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी हिंदू धर्माविषयी जनजागृती करण्यासाठी आणि युवकांचे संघटन करण्यासाठी 1983 साली सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गामाता दौड सुरू केली आहे.

गेल्या 40 वर्षापासून नवरात्र आणि दुर्गा माता दौड असे समीकरण तयार झाले आहे. आज दसऱ्याच्या दिवशी या दुर्गामाता दौडचा समारोप करण्यात आला आहे.

दरम्यान, दसऱ्यानिमित्त दरवर्षी शिवसेनेची मेळावा घेण्याची परंपरा आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांनी ही परंपरा जपत आपापले दसरा मेळावे घेतले आहे.

यावर्षी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. तर दुसरीकडे परळीतील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळावा सुरू झाला आहे.

या मेळाव्यामध्ये कोण कोणती भूमिका मांडणार आहे ? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe