Sushma Andhare | आम्हाला मेळाव्याच्या माध्यमातून इव्हेंट करायचा नाही; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला

Sushma Andhare | पुणे: आज दसऱ्यानिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटाचा मेळावा पार पडणार आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे.

या मेळाव्यामध्ये दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे.

आम्हाला इव्हेंट आणि शक्ती प्रदर्शन करायचं नाही. ज्यांना इव्हेंट करायचा आहे, त्यांनी बसेस बुक केल्या आहेत, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे गटाला धारेवर धरलं आहे.

We have not booked buses for Dasra melawa – Sushma Andhare

सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, “दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आम्हाला इव्हेंट करायचा नाही. ज्यांना दसरा मेळाव्याच्या माध्यमातून इव्हेंट आणि शक्ती प्रदर्शन करायचा आहे, त्यांनी किती बसेस बुक केल्या आहे? त्याबद्दल ते सांगतील.

दसरा मेळाव्यासाठी आम्ही बसेस वगैरे बुक केलेल्या नाही. त्याचबरोबर आम्ही कुठेही गाड्या पाठवलेल्या नाही. तर आम्ही कुठल्याही आमदार आणि खासदारावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी सोपवलेली नाही.

ज्यांना कुणाला शिवतीर्थाबद्दल एक आस्था आहे, ते दसरा मेळाव्यासाठी हजर असतात. ज्यांना शिवतीर्थावरून वर्षभर काम करण्याची ऊर्जा घ्यायची असते, ते मेळाव्यासाठी येतात.

त्याचबरोबर ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सोनं लुटायचं असतं, असे शिवसैनिक शिवतीर्थावर येतात. निष्ठावंत शिवसैनिक आपल्या कष्टाची भाकर सोबत घेऊन शिवतीर्थावर येतो. त्या कष्टकरी आणि प्रामाणिक शिवसैनिकांचं आम्ही आज शिवतीर्थावर स्वागत करणार आहोत.”

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर अनेकदा सत्ताधारी पक्ष टीका करत असतो. यावेळी बोलत असताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या मुद्द्यावर देखील भाष्य केलं आहे.

त्या म्हणाल्या, “कधीकाळी भाजपच्या तोंडात असणारी वाक्य आज माझ्या भावांच्या तोंडात आहे. त्यांची विधान अधोरेखित करतात की ते स्वतःचा मेंदू न वापरतात भाजपने दिलेल्या ओळी वाचत आहेत.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.