Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: काल झालेल्या दसरा मेळाव्यात बोलत असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.
भाजप अवलादी लक्षणाचा पक्ष आहे. जिथे जातो तिथे सत्यानाश करतो. कोरोना काळामध्ये मी राज्याला माझं कुटुंब म्हणून ‘माझं कुटुंब माझं, जबाबदारी’ म्हणून काम केलं आहे. त्यावेळी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून मी जनतेच्या मनात स्थान मिळवलं.
त्यांना घराणेशाहीला विरोध करायचा आहे ना? त्यांनी तो जरूर करावा. सगळी घराणी चांगली नसतात किंवा सगळी वाईट नसतात. जो ज्या घराण्याचा तशी त्याची ओळख बनते. रिकाम्या थाळ्या बडवायला लावणारं तुमचं हिंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व शिवभोजन देणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर काँग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
Narendra Modi’s achievements have been accepted by the whole country – Chandrashekhar Bawankule
ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर काँग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. खरं तर हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांना इंडी आघाडीचे गोडवे गावे लागत आहेत.
नरेंद्र मोदी ’जींचं कर्तृत्व संपूर्ण देशानं मान्य केलं आहे. पण उध्दव ठाकरे त्यांच्यावर टीका करत आहेत. खरं तर ती त्यांची पात्रता नाही. संपूर्ण देश मोदीजींचं कुटुंब आहे पण ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी‘ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना ते कळणार नाही.
उद्धव ठाकरे शिवतीर्थावर बोलताना हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबद्दल बोलतील असं वाटलं होतं पण ते मूग गिळून गप्प बसले.
कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केल्याबद्दल ते आज तरूणांची माफी मागतील, असं वाटलं पण त्यांना महाराष्ट्रातील तरूणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची जास्त चिंता वाटत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा समाज आक्रमक; मनोज जरांगे आज पासून करणार आमरण उपोषण
- Uddhav Thackeray | ‘खोके’ शाहीत रमलेलं सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं लांच्छन कसं दूर करणार? ठाकरे गटाचा खोचक सवाल
- Weather Update | नागरिकांनो सावधान! तेज चक्रीवादळामुळे ‘या’ ठिकाणी होणार पाऊस
- Prakash Ambedkar | आमच्या हातात सत्ता आली तर नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात टाकू – प्रकाश आंबेडकर
- Govt Job Opportunity | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची संधी! आजच करा अर्ज