Maratha Reservation | मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाही; मनोज जरांगेंनी गिरीश महाजनांना झापं झापं झापलं

Maratha Reservation | मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गेल्या महिन्यापासून आंदोलन सुरू केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं होतं. त्यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाला 40 दिवसांचा वेळ दिला होता.

ही मुदत संपलेली असून मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहे. याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

Girish Mahajan’s reaction on Maratha reservation

गिरीश महाजन (Girish Mahajan’s reaction on Maratha reservation) म्हणाले, “राज्य शासनाला मराठा समाजाला टिकणार आरक्षण (Maratha Reservation) द्यायचं आहे. आम्ही शब्द दिला आहे.

गेल्यावेळी आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, त्यामुळे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या. त्याचबरोबर या मुद्द्यावरून तुम्ही कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेऊ नका.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही काम करत आहोत, त्याचबरोबर आम्ही तुम्हाला आरक्षण देणारच आहोत. या मुद्द्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण करणार नाही. आम्हाला थोडा वेळ मिळाला तर चांगला मार्ग निघेल, त्यामुळं तुम्ही आम्हाला थोडी संधी दिली पाहिजे.”

Manoj Jarange’s reaction on Maratha reservation

गिरीश महाजन यांना मनोज जरांगे (Manoj Jarange’s reaction on Maratha reservation) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ असं तुम्ही म्हटलं होतं. मात्र, अद्याप ते देखील झालेलं नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी तुम्ही एक महिन्याचा वेळ मागितला होता. परंतु, आम्ही तुम्हाला त्याहून अधिक दिवस दिले. परंतु, अजून देखील आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.