Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या मागे अदृश्य शक्ती? संजय शिरसाट म्हणतात…

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपोषणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चागलं तापलं आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. परंतु, मनोज जरांगे यांनी त्यांची विनंती स्वीकारलेली नसून ते आपल्या उपोषणावर ठाम राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय (Sanjay Shirsat) शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Shirsat commented on Manoj Jarange

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat commented on Manoj Jarange) म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या मागे अदृश्य शक्ती वगैरे काही नाही.

मनोज जरांगे अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते आहे. ते त्यांच्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. परंतु, त्यांच्या आंदोलनाचा काही लोक फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे.

त्यांच्याशी जरांगे यांचं काही घेणं देणं नाही. परंतु, काही राजकीय भोंगे या मुद्द्यावरून आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीवर राज्य सरकार सिरिअस असून योग्य तो निर्णय काढण्याच्या मार्गावर आहे.”

Sambhajiraje Chhatrapati commented on Manoj Jarange

दरम्यान, मनोज जरांगे यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजी राजे छत्रपती यांनी उपोषण स्थळी  दाखल होऊन जरांगे यांची भेट घेतली आहे.

त्यावेळी ते म्हणाले, “जो माणूस आपल्या समाजासाठी दिवस-रात्र कष्ट करतो, त्याचबरोबर जो माणूस आपल्या जीवापेक्षा समाजाला महत्त्व देतो, अशा लोकांना पाठिंबा देणं ही छत्रपती घराण्याची जबाबदारी आहे.

मनोज जरांगे यांच्या पाठीशी आम्ही आहोत. मनोज जरांगे यांनी उपोषण करावं पण त्यांनी पाणी घेऊन आमरण उपोषण करावं, अशी माझी त्यांना हात जोडून विनंती आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.