Chandrakant Khaire | ठाकरे-शिंदे गटात कलगितुरा; चंद्रकांत खैरेंकडून संजय शिरसाटांना शुभेच्छा

Chandrakant Khaire | औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राजकीय नेत्यांची टोलेबाजी पाहायला मिळाली. ठाकरे-शिंदे गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर चांगलीच टोलेबाजी केली. शिंदे गटाचे ‘संजय शिरसाट मंत्री झाले, तर त्यांना शुभेच्छा’ असं ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

‘चंद्रकांत खैरे साहेब माझे दुश्मन नाहीत आम्ही एकत्र सेना वाढविली’, असं शिरसाट यांनी म्हणाले आहे. औरंगाबादमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शिंदे-ठाकरे गटाने नेते एकत्र व्हीआयपी चेअरवर आजूबाजूला बसले होते. इम्तीयाज जलील, संजय शिरसाट, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे जवळजवळ बसले होते. यावेळी त्यांनी चांगलीच टोलेबाजी पहायला मिळाली.

“प्रजासत्ताक दिन असल्याने रांग, राजकारण असल्याचे कारण नाही. प्रजासत्ताक दिन हा देशाच्या दृष्टीने मोठा दिवस असतो. पण, प्रजेची सत्ता येणे बाकी आहे. हा दिवस महत्त्वाचा असल्याने आम्ही ध्वजारोहणाला आलो” असे अंबादास दानवे यांनी म्हणाले आहेत.

एका बाजूला चंद्रकांत खैरे बसले होते. त्यांच्या बाजूला संजय शिरसाट बसले होते. तर, दुसरीकडे अंबादास दानवे बसले होते. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये अंतर होते. पण, संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे एकाच सोफ्यावर बसले होते. शिरसाट आणि खैरे यांच्यात अंतर नव्हते. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “आम्ही सर्व खैरे साहेबांच्या नेतृत्वात काम करत होतो.”

“अंबादास दानवे यांना जवळ बसायला सांगितलं होतं. पण, ते तिकडं बसले. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना कॅबिनेट दर्जा आहे. आम्ही आपलं…”, असे चंद्रकांत खैरे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Back to top button