Chandrakant Patil | “एकत्र येणं आणि भ्रमनिरास होणं हा इतिहास”; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे-आंबेडकरांना टोला

Chandrakant Patil । पुणे : ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांची राजकीय युती झाली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले.

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार का? हा सवाल उपस्थित केला जात होता. अनेकांनी या युतीवरुन टीका केली आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावरून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे.

“त्यांची युती किती काळ टिकेल, हा येणारा काळच ठरवेल. याचा दोघांना फायद होईल की त्याचा तोटा, पुढील काळात स्पष्ट होईल. किती काळ ते एकत्र राहणार? एकत्र येणं आणि भ्रमनिरास होणं हा इतिहास आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे आणि आंबेडकरांना डिवचले आहे.

जयंत पाटील यांनी केलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या वक्तव्याबाबत बाबत ते म्हणाले, “असे गौप्यस्फोट त्या त्या वेळी का केले जात नाही. उशिरा सुचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नसतो. संदर्भ नसलेल्या गोष्टी असतात. त्यामुळे जयंत पाटील काय म्हणाले, कुणी काय म्हणालं, याला काही अर्थ राहत नाही.”

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.