Dada Bhuse | “जिथे कुंकू लावले, तिथे सुखाने नांदा”; पक्षांतर केलेल्या ‘या’ नेत्याला दादा भुसेंचा खोचक टोला

Dada Bhuse | नाशिक : भाजपची साथ सोडून अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन शिवबंधन बांधले आहे. हिरे यांच्या पक्षांतराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अद्वय हिरे हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रासह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान असलेल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार आहे. अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशावर शिंदे गटाचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी खोचक टोला लगावला आहे.

“लोकशाहीत कुणालाही कुठेही जायचे अधिकार आहे. गेल्या घरी त्यांनी सुखात रहावे, ज्या ठिकाणचे कुंकू लावले त्या ठिकाणी सुखाने नांदावे” असा चिमटा दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांना काढला आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मोठी फूट पडली. त्यावेळी दादा भुसे शिंदे गटासोबत गेले. शिंदे गटाची भाजपशी युती झाली. या घडामोडीनंतर भुसे यांच्या विरोधात जोरदार आघाडी करणाऱ्या डॉ. अद्वय हिरे यांची कोंडी झाली होती. अखेर त्यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेच्या ठाकरे गटाला जवळ केले आहे.

नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडले असून शिंदे गटात मात्र जोरदार इन्कमिंग सुरु आहे. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गळाला भाजप नेता लागला आहे. भाजप युवा मोर्चाचे नेते डॉ.अद्वय हिरे हे भाजपला रामराम करुन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.