Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं; आरक्षणासाठी शिंदे गटातील नेत्यांने दिला राजीनामा

Maratha Reservation | यवतमाळ: जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आहे. त्यानंतर हे आंदोलन पूर्ण राज्यात पसरलं आहे.

त्याचबरोबर याचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे. अशात आता शिंदे गटातील नेत्यांने मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Chitangrao Kadam resigned for Maratha reservation

मराठा समाजाचं आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस पेटत चाललं आहे. अशात आता यवतमाळच्या शिंदे गटाच्या सहसंपर्कप्रमुख चितांगराव कदम यांनी राजीनामा दिला आहे.

मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण ( Maratha Reservation ) मिळणार नाही, तोपर्यंत मी राज्य सरकारसोबत काम करणार नसल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं आहे. चितांगराव कदम म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला 40 दिवसांचा वेळ दिला होता.

परंतु, राज्य शासनाने मनोज जरांगे यांची ही मागणी पूर्ण केली नाही. म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी माझा राजीनामा मागे घेणार नाही.”

दरम्यान, राज्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन पेटलेलं असताना आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर ( Narendra Modi At Shirdi Sai Baba ) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. आज ते शिर्डीत साई चरणी नतमस्तक होणार आहे.

अशात मराठा आंदोलक नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर मराठा समाज (Maratha Reservation) नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या या दौऱ्याचा निषेध करणार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.