Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत असताना आज सकाळी सहाच्या सुमारास वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची तोडफोड झाली आहे.
मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केली असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
याच पार्श्वभूमीवर संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. गुणरत्न सदावर्ते यांना संपवायला पाहिजे होतं, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
Sanjay Gaikwad commented on Gunaratna Sadavarte
संजय गायकवाड म्हणाले, “गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळे मराठा समाजाचं आरक्षण (Maratha Reservation) हिरावून घेतलं गेलं. त्यांनी अत्यंत प्रखरपणे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विरोधात कोर्टात बाजू मांडली होती. त्यावेळी ते अत्यंत सुडाने पेटलेले होते.
त्यामुळे त्यांच्या गाडीची तोडफोड झाली, ही शिक्षा त्यांच्यासाठी अत्यंत कमी आहे. त्यांना संपायला हवं होतं. गुणरत्न सदावर्ते संपले असते तर मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मार्ग मोकळा झाला असता.
त्यामुळे ज्याने कोणी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की गाडी फोडण्याऐवजी मोठं काहीतरी करायला हवं होतं.”
Gunaratna Sadavarte commented on Maratha Reservation
दरम्यान, या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंना अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “आज माझ्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.
मराठा समाजाचं आंदोलन (Maratha Reservation) राज्य सरकारला झेपणार नाही, पेलणार नाही, असं मनोज जरांगे सातत्याने म्हणत होते. हेच का त्यांचं पेलणार आणि झेपणार नाही.
राज्य शासनाने मनोज जरांगे यांच्यासोबत आमचं देखील म्हणणं ऐकायला हवं. त्याचबरोबर राज्य शासनाने आता त्यांचे लाड थांबवायला हवे. सरकारने त्यांचे लाड थांबवले नाही तर मी देखील उपोषण करेल, मी पण थांबणार नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | राजकारण्यांच्या गावबंदीला शिंदे गटाच्या माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा विरोध
- Maratha Reservation | मनोज जरांगेंचे लाड थांबवले नाही तर मी उपोषण करेल; गुणरत्न सदावर्ते आक्रमक
- Maratha Reservation | स्वतःची ओबीसीतून सोय करणारे राधाकृष्ण विखे पाटलांचा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध
- Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं; आरक्षणासाठी शिंदे गटातील नेत्यांने दिला राजीनामा
- Maratha Reservation | PM मोदी आज शिर्डी दौऱ्यावर; मराठा समाज अडवणार मोदींचा ताफा?