Maratha Reservation | मराठा आंदोलक पेटले; भाजप खासदाराच्या फोडल्या गाड्या

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | नांदेड: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करताना दिसत आहे. मराठा समाजचं हे आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत चाललं आहे.

काल मराठा आंदोलकांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली. तर आज मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार प्रताप चिखलीकर (Prataprao Chikhalkar) यांच्या ताफ्यातील दोन गाड्या फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर हा मुद्दा आणखीन तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

MP Prataprao Chikhalkar was barred from Ambulga village

नांदेड जिल्ह्यामधील कंधार येथील अंबुलगा गावात खासदार प्रतापराव चिखलकरांना गावबंदी करण्यात आली होती. गावबंदी असताना देखील ते त्या गावात गेले. त्यानंतर मराठा आंदोलकांनी (Maratha Reservation) नेत्यांच्या ताफ्यातील दोन गाड्या फोडल्या आहेत.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत अंबुलगा गावात कोणत्याही राजकीय नेत्यांनी प्रवेश करायचा नाही असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

गावकरी आपल्या मुद्द्यांवर आणि आपल्या मागण्यांवर ठाम आहे. अशात प्रताप चिखलीकर गावात गेले. त्यानंतर मराठा आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्या फोडल्या.

दरम्यान, मराठा आंदोलनाचे पडसाद बारामतीत देखील दिसून आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी कारखान्याच्या मोळी पूजनाला जाणार आहे.

मात्र, अजित पवारांना माळेगाव सहकारी कारखान्यात येण्यास मराठा समाज विरोध (Maratha Reservation) करताना दिसत आहे.

अजित पवारांनी ही पूजा करू नये, असं मराठी क्रांती मोर्चाने म्हटलं आहे. अशात अजित पवारांना खरंच बारामतीत बंदी घालण्यात येणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe