Weather Update | राज्यात लागली थंडीची चाहूल, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशासह राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली होती.

अशात सामान्य नागरिकांना दिलासा देणारी माहिती हवामान खात्याने दिली आहे. ऑक्टोबर हिट लवकरच संपणार असून राज्यात थंडीची चाहूल लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या माहितीनंतर नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या अरबी समुद्रामध्ये तेज नावाचं चक्रीवादळ सक्रिय झालं आहे. या चक्रीवादळामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रातील हवामानात बदल झाला आहे.

यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये तापमानात वाढ झाल्याची दिसली होती. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला.

अशात राज्यात उन्हाचा कहर संपणार असून थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढताना दिसत आहे.

Heat will reduce in the state

दरम्यान, राज्यातील उकाडा कमी होणार असून थंडीची चाहूल लागणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या वेळी गुलाबी थंडी पडताना दिसत आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा नीचांकीवर आला आहे.

त्याचबरोबर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरी तापमानात मोठी घट होत असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.