Maratha Reservation | मराठा समाज आक्रमक; अजित पवारांना बारामतीत बंदी?

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | बारामती: मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यात या आंदोलनाला सुरुवात झाली होती.

त्यानंतर त्यांनी राज्य शासनाला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली होती. 24 ऑक्टोबर रोजी ही मुदत संपलेली असून राज्य सरकारने याबाबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही.

यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मराठा समाज आरक्षण (Maratha Reservation) मिळवण्यासाठी राज्यभर आंदोलन करताना दिसत आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या (28 ऑक्टोबर) बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी कारखान्याच्या मोळी पूजनाला जाणार आहे.

परंतु, अजित पवारांना माळेगाव सहकारी कारखान्यात येण्यास तीव्र विरोध करण्यात येत आहे. अजित पवारांनी ही पूजा करू नये, असं मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Reservation) म्हटलं आहे. अजित पवार यांना स्वतःच्याच बालेकिल्लात येण्यास मराठा समाज थांबवणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

A youth committed suicide for Maratha reservation

दरम्यान, मराठा समाजाचं आंदोलन एवढं पेटलं आहे की आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा तरुण आत्महत्या करताना दिसत आहे.

बीड आणि हिंगोलीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील काल एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर आत्महत्या केली आहे.

सेकंड ईयरमध्ये शिकत असलेल्या गणेश कुबेर या तरुणाने आरक्षणासाठी आपला जीव दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत माझा अंत्यविधी करू नका, असं त्यानं त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या घटनेनंतर मराठा आंदोलन आणखीनच आक्रमक झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe