Share

Manoj Jarange | मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास दिला नकार

Manoj Jarange | जालना: मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यामध्ये आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. परंतु, … Read more

Published On: 

Manoj Jarange | जालना: मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं हे आंदोलन सुरू आहे.

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यामध्ये आमरण उपोषण सुरू केलं आहे.

त्यांच्या या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. परंतु, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

Manoj Jarange commented on Maratha Reservation

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्या दौऱ्यादरम्यान त्यांनी आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली असल्याचं आम्हाला वाटलं होतं.

मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली नाही, अशी आम्हाला शंका आहे. जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची याबाबत चर्चा केली असेल तर पंतप्रधान मोदी या मुद्द्यावर काल का बोलले नाही?”

दरम्यान, मराठा समाज आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून अत्यंत आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक गावात मराठा समाजाने पुढाऱ्यांसाठी गाव बंदी केली आहे.

बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये गावबंदीचे फलक झळकले आहे. अशात भाजप खासदार प्रतापराव चिखलकर नांदेड जिल्ह्यातील अंबुलगा गावात दाखल झाले होते.

गावबंदी असताना ते गावात दाखल झाल्यामुळे मराठा आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्या फोडल्या आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही तोपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्यांने प्रवेश करायचा नाही, असं अंबुलगा येथील ग्रामस्थांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही