Maratha Reservation | मराठ्यांच्या मुलाचं भलं होऊ नये, यासाठी फडणवीसांनी षडयंत्र रचलं – मनोज जरांगे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | जालना: राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मनोज  जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती.

मात्र, या 40 दिवसांमध्ये राज्य सरकारने मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा काढला नाही. यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे.

यादरम्यान मनोज जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे.

Manoj Jarange commented on Maratha Reservation

मनोज जरांगे म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने आम्हाला 30 दिवसांचा वेळ मागितला होता. परंतु, आम्ही त्यांना 40 दिवसांची मुदत दिली.

मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी एक पुरावा असला तरी कायदा पारित करता येतो. पुरावे नसताना बाकी समाजाला कायदा पारित करून आरक्षण मिळालं आहे.

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी राज्य शासनाकडे पुरावे आणि वेळ दोन्ही आहे. तरी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही.

मराठ्यांची मुलं मोठी होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं  हे षडयंत्र आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना फक्त खुर्ची पाहिजे. त्यांना मराठ्यांच्या मुलांशी काही घेणं-देणं नाही. मराठ्यांच्या मुलांचं करिअर वाया गेलं पाहिजे, यासाठी हे सर्व ते ठरवून करत आहे.

परंतु, आम्ही आरक्षण (Maratha Reservation) घेणारच आहोत. राज्य सरकारने मागितलेली मुदत आमची फसवणूक करण्यासाठी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माझा विश्वास होता.

आज देखील माझा त्यांच्यावर विश्वास आहे. परंतु, मी त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांचं  मोठं आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले होते. ते त्यांच्या खुर्चीसाठी दिल्लीत गेले होते का? महाराष्ट्रात एवढं मोठं आंदोलन सुरू आहे, हे त्यांनी पंतप्रधानांना का नाही सांगितलं?”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe