Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना काल (26 ऑक्टोबर) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते.
त्यांच्या या दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीमध्ये त्यांच्या भेटीसाठी गेले होते.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेले असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Manoj Jarange commented on Maratha Reservation
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देतील, असा विश्वास मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी व्यक्त केला होता. परंतु, मनोज जरांगे यांचा हा विश्वास डगमगला असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मनोज जरांगे यांच्या विश्वासाला तडा गेल्या असल्याचं बोललं जात आहे. “महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते.
ते या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींशी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर चर्चा करतील, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र, त्यांनी याबाबत त्यांच्याशी चर्चा केली नाही, अशी आम्हाला शंका आहे.
राज्य सरकारने मागितलेली मुदत ही आमच्यासाठी फसवणूक होती. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माझा विश्वास होता. आज देखील माझा त्यांच्यावर विश्वास आहे.
पण सध्या घडत असलेल्या घटनांवरून मी त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
यावरून मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असलेला विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे डगमगला असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मनोज जरांगेंना काही झालं तर तुमचं घराबाहेर पडणं कठीण होईल; जरांगेच्या कुटुंबाचा राज्य शासनाला इशारा
- Maratha Reservation | मराठ्यांच्या मुलाचं भलं होऊ नये, यासाठी फडणवीसांनी षडयंत्र रचलं – मनोज जरांगे
- Manoj Jarange | मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास दिला नकार
- Maratha Reservation | देशातील मराठ्यांची सरकारला गरज नाही; मनोज जरांगेंची मोदींवर टीका
- Maratha Reservation | मराठा आंदोलक पेटले; भाजप खासदाराच्या फोडल्या गाड्या