बीड, 20 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २०२९ च्या निवडणुकांसाठी मोठी रणनीती आखली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी त्यांनी फडणवीस सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. सत्ताधाऱ्यांनी या आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा जरांगे यांनी बीडच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्यातून दिला. जे पक्ष किंवा नेते मराठ्यांच्या विरोधात जातील, त्यांना २०२९ च्या निवडणुकीत निवडून न देण्याचा थेट आदेश त्यांनी समाजाला दिला आहे.
नारायणगडावरील या मेळाव्याला मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली होती. व्यासपीठावर जाण्यापूर्वी जरांगे यांनी महंत शिवाजी महाराज आणि नगद नारायणाचे दर्शन घेतले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, हा आक्रोश आणि संघर्ष कशासाठी सुरू आहे, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. आपला समाज गेल्या तीन वर्षांपासून झुंज देत आहे. नेत्यांना आणि पक्षांना मोठे करण्यासाठी लोकांचे जीव जात आहेत, पण आता समाजाची पत वाढवण्यासाठी हा लढा आहे. समाजाने साथ सोडल्यास नेत्यांना तुरुंगात जावे लागेल, त्यामुळे समाज मोठा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विजयादशमीनंतरच्या नियोजनाबाबत बोलताना जरांगे यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले. राज्यभरात घरोघरी ‘मराठा सेवक’ तयार करण्यासाठी एक मोबाईल क्रमांक दिला जाईल, ज्यावर इच्छुकांनी आपले नाव आणि पत्ता पाठवायचा आहे. तसेच, कुणबी नोंदी सापडूनही ज्यांना प्रमाणपत्र मिळत नाही, ज्यांचे अर्ज स्वीकारले जात नाहीत किंवा जात पडताळणी होत नाही, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र क्रमांक दिला जाईल. “कोणता अधिकारी दाखला देत नाही, ते मी बघतोच,” असा कडक इशारा त्यांनी दिला. याशिवाय, एसईबीसी आरक्षण आणि समाजाच्या इतर अडचणी सोडवण्यासाठी तिसरा नंबर दिला जाणार असून त्यावर फोन न करता केवळ मेसेज पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले.
समाजाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना जरांगे म्हणाले की, राज्यात दुष्काळ असून समाजातील ८० टक्के लोकांचे हातावर पोट आहे. घरात एखादा नोकरीला असता तर दुष्काळाची भीती वाटली नसती. ज्यांना आपण आधार म्हणून निवडून दिले, तेच आता विरोधात काम करत आहेत. “सर्वांत जास्त मी कंस मामाला धुणणार होतो, पण मी शब्दाला पक्का आहे,” असे ते म्हणाले. मराठे कोणाच्याही जिवावर अवलंबून नसून स्वतःच्या जिवावर उभे आहेत. नेत्यांनी समाज मोठा करण्याऐवजी केवळ स्वतःची घरे भरली. मात्र, समाजाची मान खाली जाईल असे कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे सांगत, समाजासाठी आपला लढा कायम राहणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने खळबळ; शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची पहिली प्रतिक्रिया
- शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या; नारायणगडावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, ५ प्रमुख मागण्या
- मला ठार मारण्याचा कट, ३० मिनिटांची गुप्त चर्चा माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा
Quick Answers
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी फडणवीस सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे.
जे पक्ष किंवा नेते मराठ्यांच्या विरोधात जातील, त्यांना २०२९ च्या निवडणुकीत निवडून न देण्याचा थेट आदेश जरांगे यांनी समाजाला दिला आहे.
जरांगे यांनी राज्यभरात 'मराठा सेवक' तयार करण्यासाठी पहिला क्रमांक, कुणबी नोंदी व प्रमाणपत्रांच्या अडचणींसाठी दुसरा स्वतंत्र क्रमांक आणि एसईबीसी आरक्षण व इतर अडचणींसाठी तिसरा क्रमांक दिला जाईल असे सांगितले.
व्यासपीठावर जाण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी महंत शिवाजी महाराज आणि नगद नारायणाचे दर्शन घेतले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








