मला ठार मारण्याचा कट, ३० मिनिटांची गुप्त चर्चा माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा

नारायण गडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला ठार मारण्याचा कट आणि ५०० कोटींच्या बदनामीबाबत धक्कादायक दावे करत सरकारवर हल्लाबोल केला.

Published On: 

Manoj Jarange at Antarwali Sarati protest

बीड, 20 ऑक्टोबर: बीड येथील नारायण गडावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी दोन खळबळजनक दावे केले आहेत. आपल्याला ठार मारण्याचा कट रचला जात असून, त्याचे भक्कम पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, ५०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप करून आपली जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचेही ते म्हणाले.

आपल्याला संपवण्याबाबत काही दिवसांपूर्वी झालेली ३० ते ४० मिनिटांची एक गुप्त चर्चा आपल्यापर्यंत पोहोचली असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. “जरांगेंना कसं मारायचं, यावर त्यामध्ये चर्चा झाली आहे. यात एका माजी मुख्यमंत्र्यांचे नाव असून, हे माजी मुख्यमंत्री ‘बाळासाहेब ठाकरे आमचा बाप आहे’ असे म्हणायचे,” असे जरांगे म्हणाले. या चर्चेतील एका भयंकर वक्तव्याचा संदर्भ देत, संबंधित नेत्याने ते ऐकल्यास तो उद्याच पक्ष सोडेल, इतकी ती भयंकर कमेंट असल्याचे त्यांनी सांगितले.

५०० कोटींच्या आरोपावर बोलताना जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले, ते श्रीकांत शिंदे यांना दिले आणि त्यानंतर ते मला देण्यात आले, अशी चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाजप नेत्यांना हे सांगितल्याचा दावाही त्यांनी केला. “मला हे पैसे मिळाले असते तर मी ते दुष्काळात वाटले असते. मला या आरोपाचा छडा लावायचा असून, कोण कुणाचा गेम करतंय हे मला पाहायचं आहे,” असे ते म्हणाले. शिंदेंनी पैसे घेतले असतील तर सांगावे, नसतील तर भाजप आपल्याला की शिंदेंना संपवू पाहत आहे, याच्या मुळाशी जायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकार आपल्या विरोधात कॅबिनेट बैठका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मराठा आणि कुणबी एकच असल्याबाबत किंवा आरक्षणाबाबत चर्चा न होता, वेगळीच भूमिका मांडली गेली. “आपल्याच समाजातील नेत्यांनी बैठकीत सांगितले की, जे देता येते तेच द्या आणि जे देता येत नाही त्याला थेट नाही म्हणून सांगा,” अशी माहिती जरांगे यांनी दिली. असाच प्रकार राहिल्यास उद्या हे लोक एसीबीसी, कुणबी प्रमाणपत्र आणि शेतकऱ्यांच्या मदतीलाही नकार देतील, अशी भीती व्यक्त करत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

आपल्याला ठार मारण्याचा कट रचला जात असून त्याचे भक्कम पुरावे असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच, ५०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप करून आपली जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचाही दावा त्यांनी केला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही