गोकुळ निवडणूक २०२६: सतेज पाटलांनी उलगडली महायुतीच्या १३-१२ पराभवाची ‘A टू Z’ कारणे

गोकुळ दूध संघाच्या २०२६ च्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलचा १३-१२ अशा फरकाने पराभव केल्यानंतर, या विजयामागील घडामोडी सतेज पाटील यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना उलगडल्या.

Published On: 

Give funds for the development of temples instead of Shaktipeeth highway; Satej Patil demands

कोल्हापूर, 20 ऑक्टोबर: गोकुळ दूध संघाच्या २०२६ च्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलचा १३-१२ अशा फरकाने पराभव केल्यानंतर, या विजयामागील घडामोडी सतेज पाटील यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना उलगडल्या. ३ मंत्री, २ खासदार आणि १० आमदारांचे चक्रव्यूह भेदून मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांनी सविस्तर भाष्य केले.

कोल्हापूरच्या मातीतच लढण्याची ऊर्जा असून हा छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा असल्याचे सतेज पाटील म्हणाले. विरोधकांनी देवाची भीती घालत राजकारणाची पातळी ‘ब्रेनस्ट्रोक होईल’ इथपर्यंत खाली आणली. संख्याबळ आणि बहुमत असतानाही शपथेचे राजकारण का करावे लागले?, असा सवाल करत कोल्हापूरच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या सर्वांना चोख उत्तर दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाच वर्षे एकमेकांशी भांडणारे आता एकत्र का आले आणि शपथा कोणासाठी घेतल्या जात आहेत, असे अनेक प्रश्न मतदारांच्या मनात होते. मतदारांच्याही नेत्यांकडून काही अपेक्षा असतात. त्या पूर्ण न करता केवळ एकतर्फी कारभार कोल्हापूरमध्ये खपवून घेतला जात नाही, असे पाटील यांनी सांगितले.

गेल्या दीड वर्षापासून महायुतीचे नेते बॅनर, उमेदवारांची निवड आणि जागावाटपाचे सर्व निर्णय मुंबईतच ठरतील असे सांगत होते. इतकेच नाही तर, आमचा चेअरमनही मुख्यमंत्रीच ठरवतील, असे विधान हसन मुश्रीफ यांनी केले होते. मात्र, कोल्हापूरकरांना ही गोष्ट अजिबात रुचली नाही आणि त्याचाच मोठा फटका महायुतीला या निवडणुकीत बसल्याचे सतेज पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

गोकुळ दूध संघाच्या २०२६ च्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलचा १३-१२ अशा फरकाने पराभव झाला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही