५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात नवा ट्विस्ट; एसआयटीचे पथक अंतरवालीत, जरांगेंकडून रामदास कदमांच्या चौकशीची मागणी

५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटीचे पथक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी रामदास कदम यांच्या चौकशीची मागणी केली.

Published On: 

SIT team arrives in Antarwali Sarati to investigate the audio clip case

अंतरवाली सराटी, २५ नोव्हेंबर: ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून, चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेले एसआयटीचे पथक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहे. याची माहिती मिळताच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपला छत्रपती संभाजीनगर येथील दौरा अर्धवट सोडला आणि ते तातडीने अंतरवालीकडे रवाना झाले आहेत.

“एसआयटी किंवा कोणीतरी आले आहे, त्यांचा मला फोन आला होता,” अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली. एसआयटीने ऑडिओ क्लिपची मागणी केल्यास आपण ती त्यांना देऊ, अशी तयारीही त्यांनी यावेळी दर्शवली. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.

काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत खळबळजनक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले आणि ते श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत दिले, असा दावा करण्यात आला होता. या क्लिपनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

सुरुवातीला या आरोपानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आक्रमक भूमिका घेत जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच संबंधित ऑडिओ क्लिप दोन वर्षे जुनी असल्याचा दावाही कदम यांनी केला होता. मात्र आता जरांगे पाटील यांनी थेट रामदास कदम यांचीच चौकशी करण्याची मागणी करत प्रकरणात नवा ट्विस्ट आणला आहे.

“एसआयटीने कदम यांचीही चौकशी करावी, कारण आपण जी ऑडिओ क्लिप ऐकली ती कदम यांनीही ऐकली आहे,” असे जरांगे यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील यांच्या या थेट मागणीमुळे आता या प्रकरणात एका बड्या नेत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही