Maratha Reservation | आधी आरक्षण अन् मग वेशीच्या आत प्रवेश; मराठा आंदोलकांनी मा. मंत्र्याची गाडी अडवत विचारला जाब

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | हिंगोली: राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमच्या गावात पुढाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही, अशी भूमिका राज्यातील बहुतांश गावकऱ्यांनी घेतली आहे.

छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, बीड, हिंगोली या जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये गाव बंदीचे फलक दिसून आले आहे. अशात हिंगोली जिल्ह्यात माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा (Jayaprakash Mundada) यांची गाडी गावकऱ्यांनी वेशी बाहेरच अडवली आहे.

हिंगोलीतील औंढा तालुक्यातील जवळा बाजार या ठिकाणी माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा दाखल झाले होते. परंतु, गावकऱ्यांनी त्यांची गाडी वेशी बाहेरच रोखली आहे.

तुमच्याकडून मराठा समाजाला (Maratha Reservation) अपेक्षा आहे, असं मराठा आंदोलकांनी जयप्रकाश मुंदडा यांना म्हटलं आहे. तर मी समाजाच्या सोबत असल्याचं जयप्रकाश मुंदडा यांनी स्पष्ट केलं आहे.

Manoj Jarange commented on Maratha Reservation

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला खडे बोल सुनावले आहे. ते म्हणाले, “मराठा समाज आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करत आहे.

महाराष्ट्राच्या गावागावात आमच्या या आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू आहे. कोणत्या नेत्याने जर तुमच्या गावात शिरण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रेमाने गावाच्या बाहेर काढा.

सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील नेत्यांना मी जाहीरपणे सांगतो की कृपया आमच्या गावात प्रवेश करू नका. त्याचबरोबर कोणत्याही राजकीय नेत्याने जाणून-बुजून गावात शिरण्याचा प्रयत्न करू नका.

नेत्यांनी सध्या घरी बसून थोडे दिवस आराम करायला हवा. आतापर्यंत त्यांनी गावांमध्ये विकास कामं केलं नाही. आता त्यांना काय विकास कामं करायचे आहे?

तुम्ही आमच्या दारात येऊ नका, त्याचबरोबर आम्ही तुमच्या दारात येत नाही. आमच्या दारात येऊन तुम्ही आमच्या लेकरांचं वाटोळ करत आहात.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe