Sharad Pawar | जे करणं शक्य नाही त्याचा शब्द देऊ नये; मराठा आरक्षणावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सुरू असताना या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना एक महिन्याचा कालावधी मागितला होता.

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी एक महिन्याऐवजी 40 दिवसांचा वेळ दिला होता. यादरम्यान, मराठा समाजाला आरक्षण आरक्षण मिळेल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं.

मात्र, या कालावधीमध्ये राज्य सरकारने मराठ्यांची मागणी पूर्ण केलेली नाही. त्यानंतर मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar commented on Maratha Reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता.

मनोज जरांगे यांनी दिलेल्या वेळात आरक्षणावर निर्णय घेऊ, असं आश्वासन राज्य शासनाने दिलं होतं. परंतु, ते आश्वासन पूर्ण झालं नाही.

त्यामुळं जे करणं शक्य नाही त्याचा शब्द देऊ नये. त्याचबरोबर आता उपोषण करणाऱ्यांना (Maratha Reservation) दोष देता येणार नाही.”

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून (Maratha Reservation) मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक गावकऱ्यांनी पुढाऱ्यांना त्यांच्या गावात प्रवेश बंदी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये नेत्यांना अडवण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील जवळा बाजार या ठिकाणी माजी सहकारी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांची गाडी गावकऱ्यांनी बाहेरच रोखली.

मराठा समाजाला (Maratha Reservation) तुमच्याकडून खूप आशा असल्याचं मराठा आंदोलकांनी जयप्रकाश मुंदडा यांना म्हटलं आहे. तर मी मराठा समाजासोबत असल्याचं जयप्रकाश मुंदडा यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या