Share

Maratha Reservation | खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या 50 टक्के जागा मी मराठ्यांना मिळू देणार नाही; गुणरत्न सदावर्ते आक्रमक

🕒 1 min read Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. अशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही मराठा आंदोलकांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे.

अशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही मराठा आंदोलकांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या 50 टक्के जागा मी कुणालाही मिळू देणार नसल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा समाज आणखीन आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Gunaratna Sadavarte commented on Maratha Reservation

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “यापुढे आता कोणत्याही प्रकारचा हिंसाचार घडला तर कायदेशीर प्रक्रिया केली जाईल. मनोज जरांगे यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.

परंतु, माझ्यावर हल्ला करून मला कोणीही शांत करू शकत नाही. माझी ही लढाई तात्विक आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी ही लढाई लढेल. 50 टक्के जागा या खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्या जागांमधील एकही जागा मी कुणालाही (Maratha Reservation) मिळू देणार नाही.”

Mangesh Sable commented on Gunaratna Sadavarte

दरम्यान, मंगेश साबळे या मराठा आंदोलकाने गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. “मराठा समाज खूप माजोरडा आहे, मी मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळू देणार नाही, मराठ्यांची सभा म्हणजे एक प्रकारची जत्रा असते असं गुणरत्न सदावर्ते यांचं म्हणणं आहे.

त्यांची ही विधान आमच्या भावनांना ठेच पोहोचवतात. हे वक्तव्य करत असताना ते मराठ्यांचा इतिहास विसरतात का? मराठ्यांना आरक्षण देऊ नका, त्यांच्या या वक्तव्याने आमच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून त्यांना चाप बसावा, यासाठी मी त्यांची गाडी फोडली”, असं मंगेश साबळे याने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही