Share

Maratha Reservation – माझ्या बाबांच्या जीवाला काही झालं, तर तुमचं घरातून बाहेर निघणं कठीण – पल्लवी जरांगे

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गेल्या महिन्यात अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं होतं. त्यावेळी तब्बल 17 दिवस त्यांचं उपोषण चाललं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीवरून त्यांनी आपलं उपोषण मागे घेत राज्य सरकारला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी दिला … Read more

Published On: 

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गेल्या महिन्यात अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं होतं.

त्यावेळी तब्बल 17 दिवस त्यांचं उपोषण चाललं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीवरून त्यांनी आपलं उपोषण मागे घेत राज्य सरकारला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी दिला होता.

परंतु, 40 दिवसात राज्य शासनाने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे.

Pallavi Manoj Jarange commented on Maratha Reservation

मनोज जरांगे यांची मुलगी म्हणाली, “मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या (Maratha Reservation) आणि माझ्या बाबांना घरी पाठवा, ही मी सरकारला हात जोडून विनंती करत आहे.

माझ्या बाबांच्या जीवाला काही झालं, तर तुमचं घरातून बाहेर निघणं कठीण होईल. आधी तुम्हाला गाव बंदी होती. परंतु, बाबांना काही झालं तर तुम्हाला जिल्हा बंदी देखील करण्यात येईल.”

Manoj Jarange father commented on Maratha Reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे यांचे वडील (Maratha Reservation) म्हणाले, “मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे, याला सरकारच जबाबदार आहे.”

Manoj Jarange’s wife commented on Maratha Reservation

मनोज जरांगे यांच्या पत्नी म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीवरून त्यांनी राज्य शासनाला मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा वेळ दिला.

परंतु, राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. माझी सरकारला हात जोडून विनंती आहे की मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी 17 दिवस लावू नका.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही