Eknath Shinde | ठाणे: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे.
तर दुसरीकडे अनेक राजकीय नेते पक्षांतर करताना दिसत आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाणे जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे. शिंदे गटाच्या एका नेत्याने ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
Janu Hivre will join Uddhav Thackeray group today
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्यांच्याच ठाण्यात मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे सह्याद्री ठाकूर म. संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष जानू हिवरे आज उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहे. यासाठी जानू हिवरे शहापूरहून निघाले असल्याची माहिती मिळाली आहे.
जानू हिवरे यांच्या या पक्षप्रवेशानंतर शहापूर विधानसभेचे सर्व गणित बिघडून जाणार आहे. कारण या विधानसभा क्षेत्रामध्ये बहुतांश ठाकूर म. समाजाचे आदिवासी रहिवासी आहे.
याच पार्श्वभूमीवर शहापूर विधानसभेत ठाकरेंची ताकद अधिक दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पक्षप्रवेशानंतर शिंदेंच्या चिंतेत भर पडणार आहे तर ठाकरेंच्या ताकतीत वाढ होणार आहे.
Shivaji Bhagde resigns for Maratha reservation
दरम्यान, राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी तीव्र आंदोलन करत आहे. याचे पडसाद राज्याच्या पोलिस दलात देखील दिसून आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने राजीनामा दिला आहे.
शिवाजी भागडे यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. “मी सुद्धा एक मराठाच आहे. मराठा समाज आरक्षणासाठी उपोषण करत आहे. मी देखील मराठा समाजाला काही देणं लागतो.
त्यामुळे मी पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा देत आहे. कृपया माझा हा राजीनामा मंजूर करावा ही नम्र विनंती”, असं त्यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | राज्यात कायदा- सुव्यवस्था बिघडण्याची चिन्हे; मराठा आरक्षणासाठी पोलिसांचे राजीनामा सत्र
- Maratha Reservation | शिंदे-फडणवीस मनोज जरांगेंचा जीव घेणार का? जरांगेंची प्रकृती आणखीन खालावली
- Maratha Reservation | मराठा समाज अजित पवारांच्या विरोधात आक्रमक; पवारांना बारामतीत नो एन्ट्री
- Uddhav Thackeray | पंतप्रधान असताना मोदींनी देशासाठी काय केलं? ठाकरे गटाचा खडा सवाल
- Weather Update | ऑक्टोबर हीटपासून कधी मिळणार दिलासा? पाहा हवामान अंदाज