Share

Maratha Reservation | राज्यात कायदा- सुव्यवस्था बिघडण्याची चिन्हे; मराठा आरक्षणासाठी पोलिसांचे राजीनामा सत्र

Maratha Reservation | जालना: मराठा समाजाचं आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस तापत चाललं आहे. या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील पेटताना दिसत आहे. अशात या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या राज्यकीय वर्तुळासह पोलीस दलात देखील दिसून आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे. Shivaji Bhagde resigns for … Read more

Published On: 

Maratha Reservation | जालना: मराठा समाजाचं आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस तापत चाललं आहे. या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील पेटताना दिसत आहे.

अशात या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या राज्यकीय वर्तुळासह पोलीस दलात देखील दिसून आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे.

Shivaji Bhagde resigns for Maratha reservation

मराठा समाजाचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याने जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने राजीनामा दिला आहे.

शिवाजी भागडे, असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. “संपूर्ण मराठा समाज आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी उपोषण करत आहे.

त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी मराठ्यांनी राज्य शासनाला मुदत दिली होती. मात्र, तरी देखील मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही.

मी सुद्धा एक मराठाच आहे. मी समाजाप्रती काहीतरी देणं लागतो, म्हणून मी पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा देत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण (Maratha Reservation) घ्यावं. त्याचबरोबर माझा हा राजीनामा मंजूर करावा ही नम्र विनंती”, असं शिवाजी भागडे यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

Manoj Jarange hunger strike continues for Maratha reservation

दरम्यान, मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा वेळ दिला होता. पण सरकारने यादरम्यान काहीही निर्णय घेतला नाही.

त्यामुळे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली आहे.

अशात मनोज जरांगे  यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाज आणखीन आक्रमक झालेला असून मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही