Share

Ajit Pawar – अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार; अजित पवार गटाचा दावा

Ajit Pawar – महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे नंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु आहे. भाजप कडून तश्या आशयाचा व्हिडीओ ट्विटरवर ट्विट करण्यात आला होता. ‘मी पुन्हा येणार’ हे शीर्षक देऊन व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता. तर दुसरीकडे अजित पवार गटाने अजित पवारच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील, त्यासाठी … Read more

Published On: 

Ajit Pawar – महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे नंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु आहे. भाजप कडून तश्या आशयाचा व्हिडीओ ट्विटरवर ट्विट करण्यात आला होता. ‘मी पुन्हा येणार’ हे शीर्षक देऊन व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता.

तर दुसरीकडे अजित पवार गटाने अजित पवारच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील, त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे. ( Ajit Pawar become Chief Minister of Maharashtra NCP Mla Dharmarao Baba Atram ) असं विधान राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं आहे.

काय म्हणाले धर्मराव बाबा आत्राम ( Dharmarao Baba Atram ) ?

अजितदादा (Ajit Pawar) मुख्यमंत्री होणार, असा आम्हाला विश्वास आहे. त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे. राज्यात अजित पवार गटाच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, त्यांचाच मुख्यमंत्री असेल असा फॉर्म्युला ठरला आहे, असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे.

Next CM in Maharashtra Ajit Pawar Or Devendra Fadnvis ?

दुसरीकडे भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा ट्वीट केलेला व्हिडीओ तासाभरातच डिलीट केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नंतर मुख्यमंत्री ( Ajit Pawar ) अजित पवार कि देवेंद्र फडणवीस अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही