Maratha Reservation | भाजप आमदारांचा निषेध असो; मराठा आंदोलकांनी अडवला आमदाराचा ताफा

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | अहमदनगर: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पुढार्‍यांना गावात प्रवेश मिळणार नाही, अशी भूमिका अनेक गावकऱ्यांनी घेतली आहे.

छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अहमदनगर, बीड, नांदेड इत्यादी जिल्ह्यांमध्ये अनेक गावात गाव बंदीचे फलक झळकले आहे. याच पार्श्वभूमीवर पाथर्डी येथे भाजप आमदाराच्या गाडीचा ताफा अडवला आहे.

Protesters blocked Monica Rajle’s caravan for Maratha reservation

भाजप आमदार मोनिका राजळे अहमदनगरच्या पाथर्डी येथील खरवंडीमध्ये दाखल झाल्या होत्या. मोनिका राजळे यांचा ताफा गावकऱ्यांनी गावाबाहेरच अडवला.

त्यानंतर मराठा आंदोलकांनी त्यांना मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) विचारणा केली. भाजप आमदाराचा निषेध असो, यावेळी अशा घोषणा मराठा समाजाने दिल्या आहे.

तर दुसरीकडे अजित पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत गाव बंदी घालण्यात आली आहे. अजित पवार बारामती तालुक्यातील माळेगाव मोळी कारखान्याच्या मुळी पूजनाला उपस्थित राहणार होते.

परंतु मराठा समाजाने त्यांच्या येण्यावर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना संचालक आणि पोलिसांची बैठक पार पडली होती. परंतु, ही बैठक व्यर्थ ठरली आहे.

Parameshwara Talekar resigned for Maratha reservation

दरम्यान, राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी (Maratha Reservation) तीव्र आंदोलन करत आहे. याचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे.

याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या बड्या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं,  यासाठी शिंदे गटाचे बीड उपजिल्हाप्रमुख परमेश्वर तळेकर यांनी राजीनामा दिला आहे. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण (Maratha Reservation) मिळालं पाहिजे, अशी घोषणा त्यांनी राजीनामा देताना दिली.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe