Maratha Reservation | 31 तारखेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात मराठा आंदोलकांना काही झाल्यास शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार – मनोज जरांगे

Maratha Reservation | जालना: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती.

परंतु, यादरम्यान राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.

उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठ्यांना लवकर आरक्षण मिळालं  नाही तर आमचं तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन 31 तारखेला सुरू होणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange commented on Maratha Reservation

मनोज जरांगे म्हणाले, “आमचे लेकरं आरक्षणापासून वंचित राहत आहे. माझी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना विनंती आहे की त्यांनी मुंबईत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एकत्र यावं.

मराठा आरक्षणासाठी सर्वांनी मिळून विशेष अधिवेशन बोलवावं. त्याचबरोबर माझं मराठा समाजाला देखील एक आवाहन आहे. मराठा समाजाने राजकीय नेत्यांना आपल्या गावात येऊ देऊ नये. त्याचबरोबर त्यांनी देखील आपल्या गावात येऊ नये.

आपल्या गावात येण्याऐवजी त्यांनी दिल्लीला जावं. तुम्ही जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. राज्यात मराठा समाजाचं तीव्र उपोषण सुरू आहे.

या उपोषणादरम्यान कुणाच्या जीवाला काही झालं, तर याला सरकार जबाबदार राहणार आहे. सरकारने आमचं आंदोलन गांभीर्याने घ्यायला हवं. 31ऑक्टोबर पासून आमच्या आंदोलनाचा (Maratha Reservation) तिसरा टप्पा सुरू होणार आहे.

हे आंदोलन तुम्हाला पेलणार आणि झोपणार नाही. 31 तारखेनंतर राज्य सरकारचा कार्यक्रम अत्यंत जड होईल, याची सरकारने दखल घ्यायला हवी.

राज्य सरकार मराठा आंदोलनाकडे (Maratha Reservation) लक्ष देत आहे की नाही हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. आम्ही मराठा समाजासोबत आणि जनतेसोबत प्रामाणिक आहोत. त्याचबरोबर जनतेला उत्तर देऊन आम्ही आमची जबाबदारी पूर्ण केली आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.