Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आंदोलन करत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पुढार्यांना आमच्या गावात येऊ देणार नाही, अशी भूमिका अनेक गावकऱ्यांनी स्पष्ट केली आहे.
याच पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील मराठा समाज देखील आक्रमक झाला आहे. यंदा कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा होऊ देणार नसल्याचं मराठा समाजाने म्हटलं आहे.
दरवर्षी कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठलाची महापूजा पार पडते. यंदा 23 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्री करणार आहेत.
या महापूजेला मराठा समाजाने (Maratha Reservation) विरोध दर्शवला आहे. उपमुख्यमंत्री कार्तिकी पूजेला पंढरपूरमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासू, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला पंढरपूरमध्ये प्रवेश नाही, अशी भूमिका मराठा समाजाने मांडली आहे. अशात कार्तिकी यात्रेची शासकीय पूजा खरंच होणार नाही का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Manoj Jarange commented on Maratha Reservation
दरम्यान, गाव बंदी असताना अजित पवार बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी कारखान्याच्या मोळी पूजनाला जाणार होते. परंतु, मराठा समाज त्यांच्या गावबंदीवर ठाम होता, त्यांनी अजित पवारांच्या येण्यावर बंदी घातली.
त्यानंतर अजित पवारांनी हा दौरा रद्द केला. यावरून मनोज जरांगे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. “पवारांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला आहे. याचं त्यांना दुःख झालं आहे का?
अजित पवार काय मराठा समाजापेक्षा (Maratha Reservation) मोठे आहेत का? इथे फक्त मराठा समाज मोठा आहे. त्यांना मराठा समाजाने मोठ केलं आहे.
त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी त्यांनी त्यांची संपूर्ण ताकद लावायला हवी”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | अजित पवार मराठा समाजापेक्षा मोठे आहे का? शिंदे-फडणवीसानंतर जरांगेंनी पवारांचे कान टोचले
- Maratha Reservation | 31 तारखेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात मराठा आंदोलकांना काही झाल्यास शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार – मनोज जरांगे
- Maratha Reservation | शिंदे- फडणवीसांच्या आडमुठेपणामुळे जनता वेटीस; जनसामान्यांना अजून काय काय बघावं लागणार?
- Maratha Reservation | भाजप आमदारांचा निषेध असो; मराठा आंदोलकांनी अडवला आमदाराचा ताफा
- Ajit Pawar – अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार; अजित पवार गटाचा दावा