Maratha Reservation | मराठा समाज आक्रमक; नेत्यांचं घराबाहेर पडणं झालं कठीण

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी लढत आहे. गेल्या महिन्यात मराठ्यांनी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू केलं होतं.

त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या विनंतीवरून मराठ्यांनी शासनाला या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी दिला होता. परंतु, 40 दिवसात सरकारने या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतलेला नाही.

त्यामुळे मराठा समाज आता अत्यंत आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात ठाकरे गटाच्या माजी आमदारांची गाडी मराठा आंदोलकांनी फोडली आहे.

मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीव्र आंदोलन करत आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही तोपर्यंत आम्ही नेत्यांना गावात येऊ देणार नाही, अशी भूमिका अनेक ग्रामस्थांनी स्पष्ट केली आहे.

तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यात ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित यांची गाडी मराठा आंदोलकांनी (Maratha Reservation) फोडली आहे.

बदामराव पंडित हे मोही मातेच्या दर्शनासाठी गेले होते. त्यादरम्यान मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी फोडली आहे. या घटनेनंतर राजकीय नेत्यांच घराबाहेर पडणं कठीण झालं असल्याचं दिसून आलं आहे.

Youth committed suicide for Maratha reservation

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्यातील तरुण आत्महत्या करताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीडनंतर लातूर जिल्ह्यातील ढाळेगाव येथील एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव संपवला आहे.

26 वर्षीय महेश कदम याने दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही, असं स्टेटस ठेवून आत्महत्या केली आहे. त्याच्या या आत्महत्येनंतर लातूर जिल्ह्यातील मराठा समाज (Maratha Reservation) अत्यंत आक्रमक झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.