Share

Maratha Reservation | शिंदे-फडणवीस अजून किती मराठ्यांचे जीव घेणार? आरक्षणासाठी 24 तासात दोन तरुणांची आत्महत्या

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाजाचा आरक्षण मिळवण्यासाठी सुरू असलेला लढा दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे (Manoj Jarange) स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मराठा तरुण आत्महत्या करताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यानंतर … Read more

Published On: 

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाजाचा आरक्षण मिळवण्यासाठी सुरू असलेला लढा दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे.

मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे (Manoj Jarange) स्पष्ट केलं आहे.

तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मराठा तरुण आत्महत्या करताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यानंतर बीड जिल्ह्यात आणखीन एका मराठा तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.

Youth committed suicide for Maratha reservation

मराठा समाज आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून दिवसेंदिवस पेटत चालला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाव यासाठी बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील गिरवली गावातील एका मराठा तरुणाने आत्महत्या केली आहे.

शत्रुघ्न काशीद या 42 वर्षीय व्यक्तीने पाण्याच्या टाकीवरून उडी मारत आपला जीव दिला आहे. एक मराठा, एक लाख मराठा अशी घोषणा देत त्यांनी पाण्याच्या टाकीवरून खाली उडी मारली.

यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मराठा समाजाने (Maratha Reservation) आक्रमक भूमिका घेत त्याचा मृतदेह शहरातील छत्रपती शिवाजी चौकट ठेवून आंदोलन केलं आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे. पहिली घटना बीड जिल्ह्यात घडली आहे तर दुसरी घटना क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीत घडली आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एका मराठा सेवकाने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. व्यंकट नरशिंपी ढोपरे यांनी इंद्रायणी नदीत उडी मारून आपला जीव दिला आहे. या दोन्ही घटनांनंतर मराठा समाजाचं (Maratha Reservation) आंदोलन आणखीन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही