Maratha Reservation | दुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही म्हणतं मराठा तरुणाने केली आत्महत्या

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | लातूर: मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी धडपड करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एकीकडे मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू आहे.

आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देत नसल्यानं अनेक तरुण आत्महत्या करताना दिसत आहे.

बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगरनंतर लातूर जिल्ह्यातील ढाळेगाव येथील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) स्वतःला संपवलं आहे.

Youth committed suicide for Maratha reservation

लातूर जिल्ह्यातील ढाळेगाव येथील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या केली आहे. महेश कदम असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही, असं स्टेटस ठेवून या तरुणाने स्वतःला संपवलं आहे. महेश कदम मराठा आरक्षणावरून सतत चिंतेत होता.

त्यामुळे त्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. महेश कदम हा 26 वर्षाचा होता. त्याचबरोबर तो ढाळेगावचा ग्रामपंचायत सदस्य देखील होता. त्याच्या आत्महत्येनंतर लातूर जिल्ह्यातील मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्यासह बीड जिल्ह्यात देखील एका तरुणाने याच पार्श्वभूमीवर (Maratha Reservation) आपला जीव गमावला आहे.

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील गिरवली गावातील शत्रुघ्न काशीद या 42 वर्षीय व्यक्तीने पाण्याच्या टाकीवरून उडी मारत आत्महत्या केली आहे.

एक मराठा एक लाख मराठा अशी घोषणा देत त्यांनी पाण्याच्या टाकीवरून खाली उडी मारत आपला जीव दिला. त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर मराठा समाजाने शहरातील छत्रपती शिवाजी चौकात त्याच्या मृतदेहासमोर आंदोलन (Maratha Reservation) केलं.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe