Maratha Reservation | मराठा समाजाची आक्रमक भूमिका अन् शिंदे-फडणवीस सरकारला आली जाग; मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू

Maratha Reservation | मुंबई: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून अत्यंत आक्रमक झाला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे.

मराठा समाजाला जोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा इशारा मराठा समाजाने राज्य सरकारला दिला आहे.

मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सह्याद्रीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

Maratha Reservation Sub-Committee meeting begins

मराठा समाजाचं आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. याच पार्श्वभूमीवर आज सह्याद्रीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर मनोज जरांगे यांच्या मागणीबद्दल मोठी घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Manoj Jarange’s health deteriorated

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. आज त्यांची प्रकृती अत्यंत ढासळलेली असून त्यांना बोलताना देखील त्रास होताना दिसत आहे. अशात जरांगे यांनी औषधांनी सलाईन घेण्यास नकार दिला आहे.

अशात मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण (Maratha Reservation) देऊन शिंदे-फडणवीस सरकार मनोज जरांगे यांचा जीव वाचवणार का? त्याचबरोबर आज होणाऱ्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर तोडगा निघणार का? अशा चर्चा आता सर्वत्र सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.