Share

Maratha Reservation | मराठ्यांचा संयम सुटला; मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी आमदाराच्या पेटवल्या गाड्या

Maratha Reservation | माजलगाव: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी पेटून उठला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरलं आहे. तरी देखील राज्य शासन या मुद्द्यावर लवकर तोडगा काढायला तयार नसल्याच्या चर्चा सुरू आहे. अशात मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश … Read more

Published On: 

Maratha Reservation | माजलगाव: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी पेटून उठला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात केली.

त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरलं आहे. तरी देखील राज्य शासन या मुद्द्यावर लवकर तोडगा काढायला तयार नसल्याच्या चर्चा सुरू आहे. अशात मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या गाड्या पेटवल्या आहे.

Maratha protesters pelted stones at MLA Prakash Solanke’s house

मराठा समाजाचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात प्रवेश देणार नाही अशी भूमिका अनेक ग्रामस्थांनी स्पष्ट केली आहे.

अशात माजलगावमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली आहे.

त्यानंतर मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाड्या देखील पेटवल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात एक प्रकारची खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलन आणखीन चिघळण्याआधी राज्य सरकारला मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्याची गरज असल्याच्या चर्चा आता राज्यात सुरू झाल्या आहे.

ST buses going to Marathwada from Pune cancelled over Maratha reservation

दरम्यान, मराठा आंदोलनाच्या (Maratha Reservation)  पार्श्वभूमीवर पुणे शहरातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहे.

अचानक बसेस रद्द केल्यामुळे मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यानंतर अनेक प्रवाशांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे तर अनेकांनी आपला प्रवास रद्द केला आहे.

अशात शिंदे-फडणवीस सरकारच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांना अजून किती समस्यांना सामोरे जावे लागणार आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही